मोठी दुर्घटना; इमारतीला धडकून हेलिकॉप्टर कोसळले, गृहमंत्र्यांसह 16 जणांचा मृत्यू

WhatsApp Group

युक्रेनमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. राजधानी कीवजवळील ब्रोव्हरी शहरात बुधवारी एक हेलिकॉप्टर इमारतीला धडकून कोसळले यात मंत्र्यांसह 16 लोक ठार झाले आहेत. युक्रेनच्या सुरक्षा तज्ज्ञ मारिया अवदेवा यांनी ट्विट केले की, ब्रोव्हरी मंत्री आणि युक्रेनचे अंतर्गत व्यवहार उपमंत्री हेलिकॉप्टर अपघातात मरण पावले आहेत. यामध्ये 2 मुलांसह 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.