सिंधुदुर्ग – ऐन दिवाळीच्या सणात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. सिंधुदुर्गातील देवगड सावंतवाडी, कुडाळ, आणि कणकवली या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. तसेच पुढील 3- 4 दिवस असाच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट हा नागरिकांच्या मनात भय निर्माण करणारा आहे.
पूर्व- मध्य समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचा परिणाम म्हणून पुढील 4 दिवस पावसाची स्थिति कायम राहणार आहे. दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाने कोकणात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. या पावसामुळे अंतिम टप्प्यात असणाऱ्या पिकांच्या शेतीला मोठा फटका बसू शकतो.
कोकणासह रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातही पुढील 4 दिवस पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर रत्नागिरी,पुणे आणि सोलापूर या भागातदेखील हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.