
राज्यात एकीकडे उन्हाचा चटका लागत असताना दुसरीकडे मात्र अवकाळी पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारंबळ उडाली आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगलाच अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यसह विजांच्या कटकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या उन्हाचा पारा वाढताना दिसत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, काढणीला आलेल्या पिकांना या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. ऐन उन्हाळ्यात पाऊस आल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.
दरम्यान, दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील चांगलाच अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग च्या काही भागात मुसळधार अवकाळी पाऊस झाला. गोव्यामध्येही मुसळधार अवकाळी झाला आहे. गोव्यातील फोंडा तालुक्यात अवकाळी पाऊस झाला आहे.