Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा जोर वाढला, सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीला फटका

WhatsApp Group

Mumbai Rain Update : मुंबईकरांची आजची (12 जुलै) सकाळ पुन्हा जोरदार पावसाने सुरू झाली आहे. अनेक सखल भागामध्ये आता पाणी साचायला सुरूवात झाली आहे. अद्याप रेल्वे, रस्ते मार्गे वाहतूक ठप्प झालेली नाही पण सखल भागात पाणी साचल्यामुळे वेग मंदावला आहे.

राज्यभरात सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे नद्या, नाल्यांना पूरही आला आहे. आता पुणे, कोल्हापूर, पालघर, नाशिक आणि रत्नागिरी या जिल्ह्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. 14 जुलैपर्यंत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आयएमडीकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.