राज्यात पावसाचा धुमाकूळ: 76 जणांचा मृत्यू; 838 घरांचे नुकसान, 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

WhatsApp Group

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rains) सुरू आहे. मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अशात राज्यात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा 1 जून ते 7 जुलैपर्यंतचा आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ही देण्यात आली आहे.

यापैकी गेल्या 24 तासांत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे राज्यात 838 घरांचे नुकसान झाले असून 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

याशिवाय 125 जनावरेही पावसामुळे दगावली आहेत. पूरग्रस्तांसाठी राज्यामध्ये 35 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे किमान 130 गावे बाधित झाली असून 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. राज्यात10 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान लोकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.