
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गणपतीच्या आगमनासोबत बरसायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील काही जिल्हे सोडता अनेक भागांत वादळी वारे, विजांसह पावसाने थैमान घातले आहे. दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्यानंतर दुपारी पाऊस हजेरी लावत आहे. मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये आज सायंकाळच्या सुमारास पावसाने जोरदार बॅटींग केली.
आजपासून (ता.07) राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता असून, विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान गणपती विसर्जनावेळी नागरिकांची तारांबळ उडण्यची शक्यता आहे. आज याची प्रचिती मुंबईकरांना आली असणार. कारण, मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये आज जोरदार पाऊस झाला. कोकणातही पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली आहे.
राज्यातील विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. या जिल्ह्यात पावसाचा जोर असणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेडमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे.