पाऊस आला ओ…! मुंबई अन् उपनगरात वादळी वाऱ्यासह धुमधडाक्यात पावसाची एन्ट्री…

WhatsApp Group

मुंबई – आजच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून कोणताही विलंब न करता प्रगती करत आहे आणि येत्या 48 तासात मान्सून महाराष्ट्रात पोहोचेल, असे सांगण्यात आले आहे. त्यानंतर गेल्या काही वेळापासून मुंबईसह उपनगरात (Pre-monsoon) पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट सुरू असून प्री मान्सूनमुळे नागरिक सुखावले आहेत.

उष्णतेमुळे अंगाची लाहिलाही होत असताना पावसामुळे नागरिक सुखावले आहेत. सोशल मीडियावरही मुंबईकरांनी आनंद व्यक्त करीत अनेक व्हिडीओही शेअर केले आहेत.

31 मे ते 7 जून दरम्यान मान्सूनने दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, (Arabian sea) संपूर्ण केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूचा काही भाग व्यापल्याचे वरिष्ठ IMD शास्त्रज्ञ आर के जेनामानी यांनी सांगितले आहे. मान्सूनच्या वाटचालीस कोणताही विलंब झालेला नाही. येत्या दोन दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचेल आणि त्यानंतरच्या दोन दिवसांत मुंबई व्यापेल, असं हवामान विभागाचे अधिकारी जेनामनी म्हणालेआहेत.