
कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसाने (Rain) अक्षरश: झोडपून काढलं आहे. सकाळपासून आलेल्या या (Konkan) मुसळधार पावसामुळे नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. संपूर्ण कोकणात पुढील पाच दिवस अतिवृष्टीची इशारा हवामान विभागाने गिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस आहे. तर कोकणातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहे.
चिपळूण, खेडमध्ये नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. या धुवांधार पावसामुळे ‘एनडीआरएफ’च्या तुकड्या कोकणात रवाना झाल्या आहेत. ‘एनडीआरएफ’च्या तुकड्या या चिपळूण,महाडला रवाना झाल्या आहेत. रत्नागिरीत देखील पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळं चिपळूनमध्ये रस्त्यावर जागोजागी पाणी साचले आहे. पावासामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचले आहेत. चिपळूण डिबीजे कॉलेजसमोर पाणी जमा झाले आहेत. तर महामार्गावर पावसाच्या पाण्यामुळे नदीचे स्वरुप आलं आहे. चिपळूणमध्ये अनेक सखोल भागात पाणी साचलं आहे. अरुंद नाल्यामुळे हे पाणी साचलं आहे. त्यामुळे सदर पाणी बाहेर काढण्यासाठी कर्मचारी दाखल झाले आहेत. तसेच रत्नागिरी, खेडमध्ये नद्यांनी पातळी ओलांडली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. मुसळधार पावसामुळे ‘एनडीआरएफ’च्या तुकड्या कोकणामध्ये रवाना झाल्या आहेत. एक तुकडी चिपळूण तर दुसरी महाडला पाठवण्यात आली आहे.