
पुणे – राज्यात विविध भागात पावसाने हजेरी लावायला सुरूवात केली आहे. काल आणि परवा मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain in Maharashtra) झाला. तर यानंतर आता पुण्याबाबतही हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
येत्या 48 तासांत ओरिसा आणि लगतच्या भागात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याची संभाव्य वायव्य दिशेकडे होणारी वाटचाल यामुळे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या मान्सूनच्या दोन्ही शाखा सक्रिय होऊन 2 दिवसात पुणे जिल्हा आणि पुणे शहर या ठिकाणी 5 तारखेच्या संध्याकाळपासून पुढील 4-5 दिवस चांगला पाऊस अपेक्षित आहे. हवामाने खात्याकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.