सिंधुदुर्ग – कोकणात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस पडल्याने काही काळ विदुयत पुरवठाही खंडित झाला होता.
ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी विदुयत पुरवठा खंडित झाल्यामुळे व्यापारी काहीसे निराश होते. दरवर्षी दिवाळी मोठ्या आनंदात साजरी केली जाते, मात्र यंदाच्या दिवाळीत अवकाळी पाऊस पडल्याने बऱ्याच नागरिकांनी बाजारपेठेत येण्याचं टाळलं आहे.
सिंधुदुर्गात गेले ३-४ दिवस अधून-मधून पाऊस पडत आहे. मात्र आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पावसाने वीजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली होती. राज्याच्या इतर जिल्ह्यामध्येही पावसाने हजेरी लावली आहे. तसेच आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे