
सावंतवाडी : सावंतवाडी शहर व परिसरात आज (सोमवारी) साडेतीन वाजता मुसळधार पावसाने हजेरी लावली. शहरात विजेच्या कडकडाटासह आलेल्या मुसळधार पावसामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली. शहर व परिसरात तासभरापेक्षा अधिक काळ जोरदार पाऊस पडला. दरम्यान वारंवार कोसळणाऱ्या या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत पडले आहेत. तर या पावसाचा इतर उत्पादनांवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे.