गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत अनेक राज्यांमधून थंडी कायमचीच गायब होईल. हवामानात बदल होत असतानाच पुढील 3 ते 4 दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील 48 तासांत अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल. असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या लगतच्या काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज आहे.
आयएमडी च्या अंदाजानुसार,उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात 19 ते 22 फेब्रुवारी दरम्यान पाऊस होईल. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये 21 ते 24 फेब्रुवारी दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालयीन भागातील जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीसह मुसळधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
क्रिकेट विश्वात शोककळा! या दिग्गज क्रिकेटपटूचे झाले निधन
महाराष्ट्रातही आज पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात कोकण वगळता अनेक भागात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
INSIDE MARATHI आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि शेअर चॅटवर आम्हाला फॉलो करा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!