कोकण, मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहणार

WhatsApp Group

कोकण, मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्यापर्यंत  पावसाचा जोर कायम राहील. या भागात काही ठिकाणी विजांसह पाऊस पडेल. उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुलनेनं पाऊसमान कमी राहील असा अंदाज हवामान शास्त्र विभागानं वर्तविला आहे. तर उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ भागामध्ये तुलनेत पाऊस कमी असणार आहे असेही सांगण्यात आले आहे.

परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकरी चिंतेत आला आहे. कोकणात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे भात पीक आडवं झालं आहे. भाताला आता कोंब आल्यामुळे ते भात निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्या भाताचा काही उपयोग होणार नसल्यामुळे वर्षभर आता उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.