हवामान खात्याने मंगळवारी तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे कुड्डालोर जिल्ह्यातील व्यावसायिक महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्थांमध्ये 14 नोव्हेंबरला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजामुळे मायलादुथुराई जिल्ह्यातील व्यावसायिक महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्थांना 14 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अरुण थंबुराज यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी एपी महाभारती यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
हवामान खात्यानुसार, ईशान्य मान्सूनचा प्रभाव राज्यात दिसून येईल. NDRF ने म्हटले आहे की पावसासाठी खबरदारीचा उपाय म्हणून NDRF 04 Bn Arakkonam येथे 25 लोकांच्या 10 टीम तयार आहेत. अरक्कोनम एनडीआरएफ चेन्नईतील राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या संपर्कात आहे. अरक्कोनम येथे, 24×7 ऑपरेशन सेंटर कार्यरत आहे आणि तामिळनाडू सरकारच्या गरजेनुसार कार्य करण्यास तयार आहे.
#WATCH | Tamil Nadu: As a precautionary measure for North-East Monsoon rainfall, 10 teams comprising 25 fighters are ready in NDRF 04 BN Arakkonam.
Arakkonam NDRF is in touch with the State Emergency Operations Center in Chennai. In Arakkonam, the 24×7 Operation Center is… pic.twitter.com/vLRZdIDfEz
— ANI (@ANI) November 13, 2023