कोकणात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा, शाळांना सुट्टी

WhatsApp Group

सिंधुदुर्ग : हवामान विभागातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याला देण्यात आलेल्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या, गुरुवार २० जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्या सूचनेनुसार ही सुट्टी जारी करण्यात आली आहे. गेल्या २ होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुढील दिवसांच्या पावसाच्या अंदाजानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला आज भेट देऊन राज्यातील पूरप्रवण क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या संबंधित सूचना दिल्या. यावेळी पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि गडचिरोली येथील परिस्थितीची माहिती जाणून घेतली. तसेच जिल्हा पातळीवरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्याचे निर्देश दिले.

सद्य:स्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे व रायगड रसायनी या भागात पूर परिस्थिती आहे. गडचिरोली, रायगड व रत्नागिरी जिल्हे वगळता उर्वरीत जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवलेली नाही. पूर परिस्थितीबाबत बचाव कार्यासाठी म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ च्या पथकांना आपत्कालिन परिस्थितीकरिता पूर्व तैनात करण्यात आले आहे. एनडीआरएफचे पथक पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई तर, एसडीआरएफची पथके गडचिरोली, नांदेड येथे तैनात केली आहेत