जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून गायब झालेला मान्सून आता राज्याच्या अनेक भागात सक्रिय होत आहे. राज्यात आता पुढील 12 दिवस पाऊस कायम असणार आहे. हवामान विभागाने राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे म्हटले आहे.
तसेच अनेक भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आलं आहे. काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.त्यामुळे मासेमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.