नाशिकात पावसाचा हाहाकार; गोदावरी नदीच्या पातळी वाढ झाल्यामुळे अनेक मंदिरं पाण्यात!

WhatsApp Group

नाशिक : सध्या राज्यभरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नाशिकमध्येही तुफान पाऊस (Heavy rain in Nashik) सुरू आहे. नाशिक मध्ये मुसळधार पाऊस बरसल्यामुळे आता गोदावरी नदीच्या पातळी वाढ झाली आहे. अनेक मंदिरं पाण्यात गेली आहेत.

राज्यात उशीराने आगमन झालेल्या मान्सूनच्या पावसाने आता आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली आहे. अजूनही सर्वदूर पाऊस नसला तरी ज्या ठिकाणी होतोय, तिथं परिस्थिती बिकट झाली आहे. राज्यात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा 1 जून ते 7 जुलैपर्यंतचा आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली आहे.