Weather Alert : राज्यातील या 14 जिल्ह्यांना हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’, पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस

WhatsApp Group

मागच्या पंधरा दिवसांपासून मान्सून (monsoon) आला अशी माहिती हवामान विभागाकडून (imd alert) मिळत आहे. परंतु मान्सून सक्रिय जरी असला तरी महाराष्ट्रात मान्सून (Maharashtra monsoon update) येण्यासाठी विलंब होत असल्याचे कारण पाकिस्तानमधून येणाऱ्या वाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या सीमेवर मान्सून थांबला आहे. दरम्यान राज्यातील काही भागात मान्सून सक्रिय होताना दिसत आहे. 19 ते 21 जून या कालावधीत घेणार असून, राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ (yellow alert))चा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील विदर्भासह गुजरात, मध्य प्रदेशमध्ये मान्सून पोहोचला असल्याचीही माहिती देण्यात आली. (Weather Alert)

यंदा मान्सूनला विलंब झाला असला तरी काही भागात मान्सून पूर्व पावसाने शेतकऱ्यांना याचा आधार मिळाला आहे. महाराष्ट्रातील काही भागात मान्सून सक्रिय असला तरी कमी दाबाचे पट्टे तयार होत नसल्यामुळे बाष्पयुक्त ढगांच्या निर्मितीस खूप वेळ लागत आहे.

ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी : 20 ते 21 जून
सिंधुदुर्ग: 18 ते 21 जून

यलो अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ: 19 ते 21 जून