मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बस आणि कारची जोरदार धडक, 4 जणांचा जागीच मृत्यू

WhatsApp Group

मुंबई : पालघर जिल्ह्यात आज सकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. बस आणि कार यांच्यात जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट बसला धडकून अपघाताचा बळी ठरली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.

गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणारी स्कोडा कार पहाटे तीन वाजता पालघर येथील महामार्गावर आली. त्यानंतर अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार थेट दुभाजकावर जाऊन समोरून येणाऱ्या बसला धडकली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघातात कारचा चक्काचूर
या भीषण रस्ता अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. महामार्गावरच कारमधील चार जणांचा मृत्यू झाला. तर कारमध्ये उपस्थित असलेली एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. हे वाहन गुजरातच्या सुरत जिल्ह्यातून मुंबईच्या दिशेने येत होते. कारचा क्रमांक GJ5CM2222 आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस आणि स्थानिक कासा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मदत आणि बचावकार्य सुरू केले. गाडीचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर जखमीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कारमधील मोहम्मद अब्दुल सलाम हाफिज जी (36), इब्राहिम दाऊद (60), आशियाबेन कलेक्टर (57) आणि इस्माईल मोहम्मद देसाई (42) यांचा मृत्यू झाला आहे.