शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाला मिळणार? राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी

WhatsApp Group

Shivsena Crisis Latest News : शिवसेना (Shivsena) नेमकी कुणाची?, धनुष्यबाण कोणाला मिळणार?, शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, अशा विविध मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) महत्वाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्याच्या दृष्टीने आजचा दिवस निर्णायक असणार आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार असून याकडे राजकीय पक्षांसह संपूर्ण राज्याचं लक्ष असेल.

दोन्हीही गटांकडून विविध याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे दाखल करण्यात आल्या आहे. या सर्व याचिकांवर आज एकत्रितपणे सुनावणी होणार आहे. महत्वाचे म्हणजे आता घटनापीठाच्या सर्व सुनावण्या लाईव्ह पाहता पाहता येणार आहे. यामुळे राज्याच्या सत्तासंघर्षाची आजची सुनावणी लाइव्ह होणार आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा