Health Tips: अशी घ्या पावसाळ्यात आरोग्याची काळजी

0
WhatsApp Group

ऋतू बदलला की, सगळ्यात आधी आपल्या आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात. पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे आपले आरोग्य बिघडते. या साथीच्या काळात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, ताप असे अनेक आजार होण्याची शक्यता वाढते.

पावसाळ्यामध्ये आपल्याला आरोग्याकडे अधिक भर देणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. अशावेळी आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी? हे जाणून घेऊया.

1) पावसाळ्याच्या काळात सर्व प्रकारच्या भाज्या व फळे स्वच्छ धुवून घ्यावीत. फळभाज्या स्वच्छ धुतल्या नाहीत तर पोटाचे विकार होण्याची शक्यता वाढीला लागते.
2) विशेषतः पावसाळ्याच्या काळात हलके जेवण घ्यावे. हलके जेवण पचण्यास सोपे असते.

Health Tips : पावसाळ्यात डेंग्यू-मलेरिया झपाट्याने पसरतो, लक्षात ठेवा या गोष्टी

3) पावसाळ्याच्या दिवसात तिखट, कांदा भजी, बटाटावडा असे तेलकट पदार्थ खाण्याचा मोह होतोच. मात्र तेल तसेच मसाल्याच्या पदार्थांपासून शक्यतो दूर राहावे.

4) बराच काळ उघड्यावर राहिलेले खाद्यपदार्थ शरीरात इन्फेक्शन निर्माण करू शकतात. त्यामुळे उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे.
5) पावसाळ्यात पाणी उकळवून पिण्याचा सल्ला दिला जातो. तो अगदी अवश्य पाळावा. पावसाळ्याच्या दिवसात जेवताना गरम पाणी पिणेही हितकाराक आहे.

Monsoon Care : पावसाळ्यात भिजल्यावर या 4 गोष्टी करा, अन्यथा आपण आजारी पडू शकता

6) पावसाळ्यात शरीराचे तापमान तुलनेने कमी असते. अशावेळी जीवजंतू शरीरावर चटकन हल्ला करतात. म्हणून स्वतःला जास्तीत-जास्त उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा.