लोक अनेकदा पाय दुखण्याची तक्रार करतात. ही समस्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला त्रास देऊ शकते. या दुखण्यामागे अनेक कारणे असू शकतात. स्नायूंमध्ये ताठरता येणे, शरीरात पाण्याची कमतरता, एकाच आसनात बराच वेळ बसणे, पोषणाचा अभाव, पायात अशक्तपणा अशा अनेक कारणांचा समावेश आहे. कधीकधी हे दुखणे इतके वाढते की सहन करणे कठीण होते. या त्रासापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही या घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.
पाय दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पायांना मसाज करा. यासाठी ऑलिव्ह किंवा खोबरेल तेल घ्या आणि ते थोडे कोमट करा. त्यानंतर या तेलाने पायांना मसाज करा. जर तुमच्या वेदनांचे कारण स्नायूंमध्ये अस्वस्थता असेल तर या पद्धतीचा फायदा आणखी लवकर होईल.
हेही वाचा – Immunity Booster : रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे ‘हे’ सोप्पे मार्ग!
1)पायाच्या दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी तुम्ही बर्फ लावू शकता. यासाठी एक सुती आणि मऊ कापड घ्या आणि त्यात काही बर्फाचे तुकडे ठेवा. त्यानंतर सुमारे दहा ते पंधरा मिनिटे यासह पायांचे व्यायाम करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बर्फाऐवजी थंड पट्टीचीही मदत घेऊ शकता.
2) पाय दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही रॉक सॉल्टचाही वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी गरम करून त्यात दोन-तीन चमचे खडे मीठ मिसळा. त्यानंतर या पाण्यात एक कापड भिजवून दुखणाऱ्या जागी लावा. मिठात मॅग्नेशियम आढळते जे स्नायूंच्या दुखण्यापासून नैसर्गिकरित्या आराम देते.
हेही वाचा – पिवळे दात पांढरे करण्याचे कोणते मार्ग आहेत? वाचा…
3) पाय दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आल्याचाही वापर करू शकता. यासाठी तुम्ही पाणी गरम करा आणि त्यात आल्याचे काही तुकडे टाका. नंतर या पाण्यात एक कापड बुडवून पायांना शेक द्या.
Alovera Benefits : वजन कमी करण्यासाठी कोरफड आहे गुणकारी, असा वापर केल्यास लगेच दिसेल फरक