Health Tips: दररोज किती पाणी प्यायले पाहिजे? जाणून घ्या

WhatsApp Group

आपल्या शरीरात 75 टक्के पाणी आहे. उन्हाळ्यात सगळ्यात जास्त पाण्याची गरज असते. पाणी अधिक पिणे हे आरोग्यासाठी लाभदायक असते. भरपूर पाणी प्यायल्याने अनेक आजारांपासून सुटका होते. पण दिवसभरात किती पाणी प्यायला हवे, तसेच किती प्रमाणात पाणी शरीरात जायला हवे याबद्दल अनेकांना माहिती नसतं.

पाणी का आवश्यक आहे ? 

 1. पाण्यामुळे शरीराला न्युट्रिशन (Neutrition) आणि आॅक्सिजन (Oxygen) मिळते.
 2. शरीराचे तापमान (Temprature)  व्यवस्थित राहते.
 3. पचनप्रक्रिया सुधारते आणि बद्धकोष्टतेपासून आराम मिळतो.
 4. शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे (Electrolyte) प्रमाण नियंत्रणात राहते.
 5. पाण्यामुळे शरीरातील विषजन्य पदार्थ (Toxins) आणि जंतू (Germs) बाहेर पडण्यास मदत होते.
 6. पाण्यामुळे आपल्या शरीरातील हाडे (Bones) भक्कम होतात.

किती प्रमाणात पाणी प्यायला हवे?

 1. आहार मार्गदर्शक तत्वानुसार तंदुरूस्त शरीराकरिता दिवसभरात किमान 8 ग्लास म्हणजेच 2 लिटर पाणी प्यायला हवे.
 2. तुम्ही नियमीत व्यायाम करत असाल चालत असाल तर जास्त पाणी प्यावे.
 3. आजूबाजूच्या वातावरणात तापमान जास्त असेल किंवा दमट हवामान असेल तर पाणी जास्त पिणे गरजेचे आहे.
 4. तुमच्या आहारात फळं आणि फळाच्या रसांचा समावेश असेल तर शरीराला आवश्यक असणाऱ्या पाण्याची पातळी तुमच्याकडून गाठली जाईल.
 5. आजारी पडल्यानंतर तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. परिणामी शरीरातील पाण्याचा समतोल राखण्यासाठी तुम्हाला भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. तसेच गरोदर महिलांनीही जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे असते.

कमी पाणी प्यायल्यास काय होऊ शकते? 

 1. कोरडी त्वचा (Dry Skin)
 2. तोंडातील लाळेचा अभाव (Lack Of Saliva)
 3. डोकेदुखी (Headache)
 4. बद्धकोष्टता (Constipation)
 5. संधिवात आणि थकवा (Muscal Cramp And Fatique)

पाणी पिणे कसे वाढवावे? 

 1. दिवसातून तुम्ही तीन वेळा जेवत असाल तर प्रत्येक जेवणानंतर पाणी प्या.
 2. जास्तीत जास्त पाणी शरीरात जाण्यासाठी तुमच्या फोनमध्ये अलार्म लावा.
 3. पाण्याची बाटली कायम डोळ्यासमोर ठेवा.
 4. ज्या फळांमध्ये पाण्याचा अंश जास्त आहे अशी फळे खा. उदा. कलिंगड (Watermelon) , लिंबू (Lemon)