गुढीपाडव्याआधीच नागरिकांसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आनंदाची बातमी!

WhatsApp Group

जालना – राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असताना आता नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण, १ एप्रिलपासून कोरोनासंबंधीचे सर्व निर्बंध मागे घेण्यात येणार आहेत. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.

गुढीपाडव्याआधीच नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. १ एप्रिलपासून आपत्कालीन कायदा मागे घेण्यासाठी प्रक्रिया सुरू होणार. पण असे असले तरीही मास्क वापरणं हे अनिवार्य राहणार आहे. मास्कशिवाय कोणीही बाहेर फिरताना दिसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशीही माहिती राजेश टोपेंकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, यावेळी लसीकरणाच्या बाबतीत चलढकल नको, अशा सूचना राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. लोकांकडून वारंवार रेल्वे, बस, मॉल्स यासंबंधी निर्बंध शिथील करण्याच्या मागण्या करण्यात येत होत्या. त्यावर आता सकारात्मक विचार करण्यात आला असून १ एप्रिलपासून कोरोनाचे सर्व निर्बंध काढण्यात आले आहेत. पण मास्कसक्ती मात्र कायम असेल असं ते म्हणाले आहेत.

काय म्हणाले राजेश टोपे?

  • राज्यात बाबा साहेबांची जयंतीचा उत्साहात साजरी करावी
  • १ एप्रिलपासून आपत्कालीन कायदे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होईल
  • मास्कशिवाय फिराल तर कारवाई होणार
  • बऱ्यापैकी शिथिलीकरण केलेलं आहे, फक्त मास्क अपवाद आहे
  • प्रत्येकाने आपलं लसीकरण करून घेणं आवश्यक आहे.