
Dance Viral Video: सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू आहे, अशा स्थितीत दररोज शेकडो विवाह होताना दिसत आहेत. दुसरीकडे, मोठ्या प्रमाणात लग्नाच्या मंडपांपासून वधू-वरांच्या प्रवेशाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यासोबतच लग्नाच्या मिरवणुकीतील नृत्य देखील सोशल मीडिया वापरकर्त्यांना झपाट्याने आकर्षित करत आहे.
अलीकडेच, सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती लग्न समारंभात सजवलेल्या डान्स फ्लोरवर उत्कृष्ट नृत्य सादर करताना दिसत आहे. व्हिडिओमधील व्यक्तीने केलेला डान्स यूजर्सना खूप आवडला आहे. त्यामुळेच या व्यक्तीच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर युजर्सची मने जिंकताना दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर ‘जिंदगी गुलजार है’ नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दिसणारी व्यक्ती आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित केलेल्या गाण्यावर डान्स फ्लोअरवर डान्स करताना दिसत आहे. लग्न समारंभात उपस्थित असलेले लोक त्या व्यक्तीचा डान्स पाहून टाळ्या वाजवताना दिसतात.
वाह अंकल ने क्या Dance किया है 😁👏🔥 pic.twitter.com/cME7U9slhm
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) November 24, 2022
लग्नादरम्यान ती व्यक्ती 1990 मध्ये आलेल्या दिवाना मुझे सा नही या चित्रपटातील ‘सारे लडको की कर दो शादी’ या गाण्यावर डान्स करत आहे. हे गाणे अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. वृत्त लिहेपर्यंत या व्हिडिओला सोशल मीडियावर 32 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दुसरीकडे, व्यक्तीचा डान्स परफॉर्मन्स पाहून यूजर्स सतत कमेंट करत आहेत आणि त्याला बेस्ट परफॉर्मन्स म्हणत आहेत.
Little Girls Dance: ‘मेरे सपनो की रानी’ गाण्यावर चिमुरडीचा जबरदस्त डान्स, Video होतोय व्हायरल