
‘हनुमान’च्या टीझरने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला हादरवून सोडले आहे. टीझर पाहिल्यानंतरच लोकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. चित्रपट निर्माते प्रशांत वर्मा यांनी ‘हनुमान’ दिग्दर्शित केला आहे. हनुमानच्या टीझरमध्ये मुख्य पात्र भगवान हनुमानापासून प्रेरित दिसत आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये अॅक्शनपासून रिअॅक्शनपर्यंत सर्व काही पाहायला मिळत आहे. धार्मिक पौराणिक कथा रामायण पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
हनुमान चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणतात, ‘हा चित्रपट केवळ तेलुगूमध्येच नाही तर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, हिंदीसह अनेक भाषांमध्ये रिलीज होईल. दिग्दर्शकाने चित्रपटाचे वर्णन आंतरराष्ट्रीय असे केले आहे.
‘हनुमान’च्या टीझरने बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली आहे. बॉलीवूड चित्रपट आदिपुरुष देखील धार्मिक पौराणिक कथा रामायणावर आधारित आहे. विशेष म्हणजे VFX साठी ‘आदिपुरुष’ सोशल मीडियावर ट्रोल झाला होता, तर VFX साठी या चित्रपटाची प्रशंसा होत आहे.