
तारक मेहता का उल्टा चष्मामधील प्रत्येक पात्र लोकांचे मनोरंजन करण्यासाठी खूप प्रयत्न करते. छोट्या पडद्यावर दीर्घकाळ चालणाऱ्या या शोमध्ये लोकांना काही पात्रांनी खूप हसवळे आहे. पण या पात्रांचे चेहरे अनेक वेळा बदलले आहेत. असाच एक चेहरा निधी भानुशालीचा आहे जो छोट्या सोनूच्या भूमिकेमध्ये दिसायचा.
एकेकाळी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या जुन्या सोनूला म्हणजेच निधी भानुशालीला (Nidhi Bhanushali) सोशल मीडियाची क्वीन म्हंटले जाते. सध्या निधी भानुशालीच्या बिकिनी फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. निधीचा हा अवतार आश्चर्य चकित करणारा आहे. नुकतेच या अभिनेत्रीने तिचे असे काही फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे इंटरनेटचा पारा चढला आहे.
View this post on Instagram
ज्या छोटू सोनूला लहानपणी गोंडस म्हणले जायचे ती छोटू सोनू आता खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. अलीकडेच निधी भानुशालीने तिच्या व्हेकेशन पिक्चर्सने (Nidhi Bhanushali Vacation Pictures) इंटरनेटचे तापमान वाढवले आहे.
View this post on Instagram
निधीचे चाहते तिचे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त शेअर होताना दिसत आहेत. यासोबतच तिचे चाहते लाइक्स आणि कमेंट करून निधीचे खूप कौतुक करत आहेत.