सारा तेंडुलकरचा मराठमोळा अंदाज तुम्ही पाहिला का? फोटो पाहून म्हणाल पोरगी लाखात एक..

WhatsApp Group

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकतेच सचिन तेंडुलकरच्या कुटुंबाने नातेवाईकाच्या लग्नाला हजेरी लावली. यावेळी सचिन तेंडुलकर आणि त्याची मुलगी सारा (Sara Tendulkar) खास पारंपरिक वेशामध्ये दिसून आले. या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाले आहेत.

या लग्नसोहळ्यात सारा ही पारंपारिक मराठमोळ्या वेषात दिसली होती.यावेळी साराने कपाळावर छान चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात छान दागिने परिधान केले होते.

साराने यावेळी निळ्या रंगाची साडी नेसली होती. तसेच तिने केसात छान गजराही माळला होता.सारा तेंडुलकरच्या हातामध्ये एक कलशही दिसत होता.

सचिन तेंडुलकर तिच्या कन्येसोबत एका लग्न सोहळ्यात उपस्थित होता. या समारंभात सारा ही करवली म्हणून स्वत ला मिरवत होती.

ज्या लग्नाला सचिन तेंडुलकरच्या कुटुंबियांनी हजेरी लावली होती ते दोघेही सुंदर दिसत आहेत.