
मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रानबाजार (RaanBaazaar) या वेबसिरीजचा बोलबाला आहे. बोल्डनेसमुळे ही सिरीज चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीचा यामध्ये बोल्ड (RaanBaazaar Bold Seen)अंदाज पाहायला मिळाला. प्राजक्ताला अशा वेगळ्या भूमिकेमध्ये तेही बोल्ड अवतारात पाहणं चाहत्यांना रूचलं नाही. म्हणून प्राजक्त ट्रोल देखील झाली. असं जरी असलं तर तिचं समीक्षकांकडून कौतुक देखील झालं. ज्यामुळं प्राजक्ता ( Prajaktta Mali bold seen ) ट्रोल झाली व तिचं कौतुक देखील झाले ते बोल्ड सीन सगळे एका ठिकाणी पाहता येणार आहेत.
View this post on Instagram
प्लॅनेट मराठीने इन्स्टावर रानाबाजारमधील प्राजक्ताच्या सर्व बोल्ड सीनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत त्यांनी म्हटलं आहे की, बोल्ड आणि बिनधास्त रत्ना… @prajakta_officialबघितली का?’रानबाजार’ ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर !.. हा प्रत्येक सीन कसा शूट झाला शिवाय प्राजक्तानं घेतलेली मेहनत या व्हिडिओमध्ये दिसते.