![WhatsApp Group WhatsApp Group](https://insidemarathi.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Add.gif)
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसाठी हे वर्ष आतापर्यंत चांगले गेले नाही. 2022 मध्ये प्रदर्शित झालेले त्यांचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप फ्लॉप झाले आहेत. दरम्यान, या अभिनेत्याने मंगळवारी ‘वेदात मराठे वीर दौडले सात’ या त्याच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला. या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. मात्र, अक्षयच्या या चित्रपटाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळालेला नाही.
अक्षयने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करताना सांगितले की, त्याने ‘वेदात मराठे वीर दौडले सात’चे शूटिंग सुरू केले आहे. आता अक्षयच्या लूकबाबत सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या अभिनेत्याच्या लूकवरून त्याला प्रचंड ट्रोल केले जात आहे.
View this post on Instagram
वर्क फ्रंटबद्दल बोलयचे झाले तर अक्षय ‘हेरा फेरी 3’ मधून बाहेर पडल्याचे नुकतेच समोर आले आहे. याचा खुलासा अक्षयने केला असून चित्रपटाची स्क्रिप्ट न आवडल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले. या वर्षी अक्षय बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन आणि राम सेतू या चित्रपटांमध्ये दिसला आहे.