
आपल्या सुंदर आवाजाने अल्पावधीत संगीतक्षेत्रात स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अमृता फडणवीस यांची गाणी ही नेहमीच चर्चेत राहिली आहेत. त्यांच्या गाण्यांना मीडियावर लाखोंनी व्ह्यूज मिळत असतात. त्यामुळे चाहते अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या नवीन गाण्याची वाट पाहत असतात. आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. त्याचेच निमित्त साधून अमृता फडणवीस यांचं नवीन गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.