लाहोर : पाकिस्तानातील लाहोर येथे सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) च्या सामन्यात वेगवान गोलंदाज हरिस रौफची चांगलीच दमछाक झाली. सोमवारी संध्याकाळी पेशावर जाल्मी आणि लाहोर कलंदर्स Lahore Qalandars यांच्यातील सामन्यात हॅरिस रौफ Haris Rauf भर मैदानात आपल्याच संघाच्या खेळाडूला कानाखाली मारताना दिसला. झेल सोडल्याचा राग धरत हॅरिसने कामरान गुलामला थप्पड मारली Haris Rauf Slaps Kamran Ghulam .
पेशावरविरुद्ध लाहोरकडून दुसऱ्या षटकात हॅरिस रौफ गोलंदाजी करायला आला. या षटकात कामरान गुलामने Kamran Ghulam पेशावरचा धोकादायक सलामीवीर हझरतुल्लाह जझाईचा झेल सोडला, त्यानंतर हॅरिस रौफ त्याच्यावर चांगलाच संतापलेला दिसत होता.
Wreck-it-Rauf gets Haris! #HBLPSL7 l #LevelHai l #LQvPZ pic.twitter.com/wwczV5GliZ
— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 21, 2022
यानंतर याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर हॅरिस रौफमे मोहम्मद हरीसला फवाद अहमदकडे फाईन लेगवर झेलबाद केले. या विकेटनंतर रौफ खूपच उत्साहित दिसत होता. विकेटच्या सेलिब्रेशनमध्येच जुना राग काढत हारिस रौफने कामरान गुलामला कानाखाली मारली. सध्या या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.