हार्दिक पटेल यांचा काँग्रेस अध्यक्षपदासह सर्व पदांचा राजीनामा

WhatsApp Group

गुजरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अनेक दिवसांपासून ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळामध्ये सुरु होत्या. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असतानाच हार्दिक पटेल यांच्या (Hardik Patel) राजीनाम्याने काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. ट्विट करत त्यांनी याबाबद माहिती दिली आहे.

काँग्रेस सोडताना हार्दिक पटेलने ट्विटमध्ये लिहिलं की, आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, मला विश्वास आहे की माझ्या या निर्णयाचे सर्व सहकारी आणि गुजरातमधील लोक स्वागत करतील, मला विश्वास आहे की, या पावलानंतर मी भविष्यामध्ये गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.