
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 208 धावा केल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य आहे. या सामन्यात हार्दिक पांड्याने दाखवलं रौद्र रुप आहे त्याने 30 चेंडूत ठोकल्या 71 धावा केल्या.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा (11), माजी कर्णधार विराट कोहली (2), दोघेही स्वस्तात तंबूत परतले. पण त्यानंतर क्रिजवर आलेल्या सूर्यकुमार यादवने केएल राहुलसोबत डाव सावरला. दोघांनी दमदार फलंदाजी करत धावसंख्या 100 पार नेली. पण अर्धशतक करुन राहुल 55 धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पंड्या क्रिजवर आला. सूर्या 46 धावा करुन बाद झाला. मग हार्दीकने एकहाती तुफान फलंदाजी करत 30 चेंडूत नाबाद 71 धावा ठोकल्या आणि धावसंख्या 208 पर्यंत नेत ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे आव्हान ठेवले आहे.