IPL 2022 सुरू होण्यापूर्वी गुजरात टायटन्सला एक चांगली बातमी मिळाली आहे. संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने ‘यो-यो टेस्ट’ पास केली असून तो आता आयपीएलच्या 15व्या हंगामात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे Hardik Pandya pass yo-yo fitness test . हार्दिकची ‘यो-यो टेस्ट’ चाचणी महत्त्वाची मानली जात होती कारण बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले होते की फिटनेस चाचणी पास झाल्यानंतरच हार्दिकला आयपीएल 2022 मध्ये खेळण्याची परवानगी दिली जाईल.
हार्दिक पंड्या गेल्या काही काळापासून गोलंदाजीही करत नाही आणि त्यामुळेच त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र आता या स्टार अष्टपैलू खेळाडूने फिटनेस चाचणीत उत्तीर्ण होऊन सर्व टीकाकारांचे तोंड बंद केले आहे.
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक फिटनेस चाचणी घेण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये गेला होता, जिथे त्याला त्याच्या फिटनेसची चाचणी घेण्यासाठी 10 षटके टाकण्याचे लक्ष्य देण्यात आले होते आणि आता तो यो-यो चाचणी पास झाला आहे. बीसीसीआय आयपीएलपूर्वी केंद्रीय करार असलेल्या खेळाडूंच्या फिटनेसची तपासणी करत आहे. एनसीएमधील पंड्याची कामगिरी ही भारतीय क्रिकेटसाठीही शुभ संकेत आहे.