Hardik Pandya Divorce : बिग ब्रेकिंग ! नताशा-हार्दिक पंड्याचा घटस्फोट, दोघांनी इस्टा पोस्ट करत दिली माहिती

WhatsApp Group

Hardik Pandya Divorce : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने चार वर्षांच्या नात्यानंतर पत्नी नताशा स्टॅनकोविचपासून विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. अनेक महिन्यांच्या अटकळानंतर या दोघांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून याची माहिती दिली.

हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर लिहिले की, चार वर्षे सोबत राहिल्यानंतर मी आणि नताशाने आपसी सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमचा सर्वतोपरी प्रयत्न केला आणि आमचे सर्वस्व दिले.  वेगळं होणं हे आम्हा दोघांच्या हिताचे असल्याचा आम्हाला विश्वास आहे. आम्ही एकत्र अनुभवत असलेला आनंद, परस्पर आदर आणि साहचर्य या सर्वांचा आम्ही वेगळं होताना विचार केलाय. आम्ही एक कुटुंब वाढवत असताना हा निर्णय घेणे आमच्यासाठी कठीण होते.  अगस्त्यला आमचे आशीर्वाद आहेतच. त्याच्या आनंदासाठी आपण त्याला जे काही देऊ शकतो, ते देऊ याची खात्री करण्यासाठी आम्ही सह-पालक राहू. या कठीण आणि संवेदनशील काळात आम्हाला प्रायव्हेसी देण्याची आणि  समजून घेण्याची मनापासून विनंती करतो.

चार वर्षांचा संसार

हार्दिक पांड्याने 31 मे 2020 रोजी मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी लग्न केले होते. दोघांनी त्याच वर्षी 30 जुलै रोजी मुलाला जन्म दिला. लग्नाच्या जवळपास तीन वर्षांनी हार्दिक आणि नताशाने फेब्रुवारी 2023 मध्ये उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्न केले. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने उदयपूरमधील डेस्टिनेशन वेडिंगमध्ये या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या विधींची पुनरावृत्ती केली. यावेळी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by @natasastankovic__

14 फेब्रुवारी रोजी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्नाचे विधी पार पडले होते. एका दिवसानंतर दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by @natasastankovic__

 

View this post on Instagram

 

A post shared by @natasastankovic__

यापूर्वी नताशा तिचा मुलगा अगस्त्यसोबत मुंबई विमानतळावर दिसली होती. त्यानंतर ती बॅग घेऊन निघताना दिसली. तिने सोशल मीडियावर सूटकेसचा फोटो देखील पोस्ट केला होता, ज्यानंतर ती भारत सोडून जात असल्याची शक्यता वर्तवली जात होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by @natasastankovic__