पहिल्यांदाच सासरच्या मंडळींना भेटल्यानंतर हार्दिक पांड्या झाला भावूक, व्हिडिओ केला शेअर

WhatsApp Group

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हार्दिक पांड्याने अनेकवेळा दमदार कामगिरी केली आहे. पांड्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतो. पांड्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नुकताच त्याने एक इमोशनल व्हिडिओ शेअर केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा व्हिडिओ त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक हिच्याशी संबंधित आहे.

पांड्या पहिल्यांदाच पत्नी नताशाच्या कुटुंबाला भेटला. त्याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केला आहे. पंड्याला भेटल्यानंतर नताशाच्या कुटुंबातील लोक खूपच भावूक झाले होते. पांड्या आणि नताशाने 2020 मध्ये लग्न केले होते. या दोघांच्या जोडीचे खूप कौतुक झाले. हार्दिक आणि नताशा यांना आता एक मुलगाही आहे.