मोठी बातमी, Hardik Pandya हार्दिक पांड्या बनला भारताचा नवा कर्णधार

मुंबई – 26 जूनपासून आयर्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुल आणि सध्याचा कर्णधार ऋषभ पंत यांच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे Hardik Pandya lead team India .
आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी ऋषभ पंतला स्थान मिळालेले नाही, कारण तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याचा भाग असणार आहे. अशा परिस्थितीत संजू सॅमसनची यष्टिरक्षक म्हणून भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. याशिवाय, आयपीएल 2022 दरम्यान दुखापतग्रस्त मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवचेबी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
आयर्लंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ – हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
Rahul Tripathi and Sanju Samson find a place in the 17-member squad, Bhuvneshwar Kumar named vice-captain pic.twitter.com/rzLt7mQmmc
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 15, 2022