IND vs ENG: हार्दिक पांड्याने केली वनडेतील सर्वोत्तम गोलंदाजी, इंग्लंडविरुद्ध केला हा अनोखा विक्रम

WhatsApp Group

हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहलच्या घातक गोलंदाजीमुळे भारताने यजमान इंग्लंडला मँचेस्टर येथे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 259 धावांत गुंडाळले. हार्दिक पांड्याने 7 षटकात 18 धावा देऊन 4 बळी घेतले तर चहलने 9.5 षटकात 3 विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात हार्दिक पांड्याने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी केली. याआधी त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 31 धावांत 3 बाद होती, जी त्याने धर्मशाला येथे न्यूझीलंडविरुद्धच्या त्याच्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात केली होती. विशेष म्हणजे, आता हार्दिकची तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाजी इंग्लंडच्या भूमीवर इंग्लिश संघाविरुद्ध झाली आहे.

3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने यजमान इंग्लंडला सलग तिसऱ्यांदा सर्वबाद करण्यात यश मिळविले. याआधी, मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 110 धावांत गुंडाळले होते. त्याचवेळी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा संघ 246 धावांवर सर्वबाद झाला होता.

हार्दिक पांड्याची सर्वोत्तम गोलंदाजी

कसोटीमध्ये – 5/28 वि ENG, इंग्लंडमध्ये
T20 मध्ये – 4/33 वि ENG, इंग्लंडमध्ये
एकदिवसीय सामन्यांमध्ये – 4/24 वि ENG, इंग्लंडमध्ये