मुंबई इंडियन्स नाही आता ‘या’ संघासाठी कर्णधार होऊन IPL खेळणार हार्दिक पांड्या!

WhatsApp Group

मुंबई – आयपीएल 2022 साठी अहमदाबाद संघाने 3 दिग्गज खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, अहमदाबादचा संघ हार्दिक पांड्या आणि राशिद खानला प्रत्येकी 15 कोटी आणि शुभमन गिलला सात कोटींमध्ये खरेदी करणार आहे. तर हार्दिक पांड्याकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात येईल असेही सांगण्याl आले आहे.

अहमदाबाद संघाने यापूर्वीच आपल्या कोचिंग स्टाफची निवड केली आहे. संघाचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा असेल तर इंग्लंडचा माजी सलामीवीर विक्रम सोलंकी यांना संघाचे संचालक बनवण्यात आले आहे.त्याचबरोबर भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन हे संघाचे मार्गदर्शक असतील. यापूर्वी हार्दिक मुंबई इंडियन्सकडून, रशीद सनरायझर्स हैदराबादकडून आणि शुभमन गिल कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळत होता.


शुभमन गिलबद्दल सांगायचे तर अहमदाबाद हा त्याचा आयपीएलमधील दुसरा संघ असेल. शुभमन 2018 पासून कोलकाताकडून खेळत होता. कोलकाताने त्याला 1.8 कोटींना खरेदी केले. तर राशीदला 2017 मध्ये सनरायझर्स हैदराबादने 4 कोटी रुपयांना खरेदी केले होते. यानंतर 2018 मध्ये हैदराबादने त्याला नऊ कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवले आहे.

हार्दिक पांड्या 2019 मध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकापासून तंदुरुस्तीशी झगडत आहे. त्‍याच्‍या पाठीवरही शस्‍त्रक्रियाही करण्‍यात आली आहे. आयपीएलच्या शेवटच्या मोसमात हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली नव्हती. T20 विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्येही त्याने गोलंदाजी केली नाही. यामुळे पांड्याला भारतीय संघातून आपले स्थान गमवावे लागले होते. मुंबई इंडियन्सनेही त्याला रिटेन न करण्याचा निर्णय घेतला होता.

हार्दिक पांड्या हा मुळचा गुजरातचा असून स्थानिक चाहत्यांमध्ये त्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी फ्रेंचायझीने त्याला कर्णधार बनवणार आहे.