हार्दिक पांड्या वेस्ट इंडिज बोर्डावर नाराज, सर्वांसमोर केला अपमान

WhatsApp Group

वेस्ट इंडिजसोबत खेळलेली एकदिवसीय मालिका भारतीय संघाने 2-1 ने जिंकली आहे. मालिकेतील तिसरा सामना ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला गेला, जो टीम इंडियाने 200 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. रोहित शर्मा विराट कोहलीच्या अनुपस्थितीत, हार्दिक पांड्याकडे संघाची कमान सोपवण्यात आली आणि त्याने प्रथम कर्णधारपदाची उत्कृष्ट खेळी खेळली, नंतर गोलंदाजांचा चांगला वापर करून त्याने विंडीजला 151 धावांवर सर्वबाद केले. मात्र, सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्याने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडे नाराजी व्यक्त केली. मॅचनंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये पांड्या काय म्हणाला ते जाणून घेऊया…

काय म्हणाला हार्दिक पांड्या…

भारतीय क्रिकेटपटूंच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डावर नाराजी जाहीर केली आहे. तो म्हणाला “संघाला कोणत्याही चैनीच्या गोष्टी नको आहेत, पुढील वेळी जेव्हा आम्ही दौरा करु तेव्हा मुलभूत गोष्टींची काळजी घेतली जाईल अशी आशा आहे”.

कसोटी मालिका संपल्यानंतर टीम इंडिया वनडे मालिकेसाठी बार्बाडोसला रवाना झाली. त्यानंतर विमानाला उशीर झाल्यामुळे त्यांना सुमारे 4 तास विमानतळावर थांबावे लागले होते. याशिवाय टीम इंडियाला काही गैरसोयीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हार्दिक पांड्याने नाराजी व्यक्त केली.