Happy New Year 2024 Wishes In Marathi: नवीन वर्षाच्या अशा द्या खास शुभेच्छा
Happy New Year 2023 Wishes In Marathi: सर्वप्रथम या पोस्टला भेट देणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मित्रांनो, जर तुम्ही हे नवीन वर्ष 2024 तुमच्या कुटुंबाला, मित्रांना, शेजाऱ्यांना पाठवण्यासाठी New Year Wishes In Marathi 2024 शोधत असाल तर ही पोस्ट फक्त तुमच्यासाठी आहे.
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2024 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलुवुया
नववर्षाभिनंदन
वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.
माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे.
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नववर्षाभिनंदन!
2024 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.
हे वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो.
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन !
सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष…..नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
इतर दिवसांसारखाच असतो हा ही दिवस
तसाच उगवतो अन तसाच मावळतो…
तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला ..
या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो
आशेच्या नव्या किरणांचा नजराणा..
त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी
अन सोनेरी स्वप्नांची झळाळी ..
म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस.
तो असतो नव्या वर्षाचा आरंभ !
नव्या स्वप्नांचा प्रारंभ !!
गतवर्षीच्या …
फुलाच्या पाकळ्या वेचून घे..
बिजलेली आसवे झेलून घे…
सुख दुःख झोळीत साठवून घे…
आता उधळ हे सारे आकाशी ..
नववर्षाचा आनंद भरभरून घे !!
वर्ष नवे !!
नव्या या वर्षी..
संस्कृती आपली जपूया ..
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या .. !!.
पाकळी पाकळी भिजावी,
अलवार त्या दवाने ..
फुलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
स्वप्न नवे !!
दुःख सारी विसरून जावू ..
सुख देवाच्या चरणी वाहू…
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!
चला….या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस
माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!
तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा
आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत…
कळत नकळत 2023 मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,
.
.
.
2024 मध्ये पण तयार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…
त्येक वर्ष कसं .. पुस्तकासारखंच असतं ना .. ३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू.. तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं,
नवी नाती, नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
नमस्कार!
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
नवीन वर्ष 2024 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!