मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आणि स्टेटस

WhatsApp Group

मैत्री हे एक नातं आहे ज्यात प्रेम आहे, भांडणे आहेत आणि एकमेकांसाठी काहीही करण्याची भावना देखील आहे. मित्रासोबत तुम्ही तुमचे सर्व सुख-दु:ख शेअर करू शकता, त्यांच्याशी बोलून तुम्ही तुमचे ओझे हलके करू शकता. यामुळेच मित्राला सर्वोत्तम नातेसंबंधांपैकी एक मानले जाते. अशा मित्रांना मनापासून धन्यवाद म्हणण्याचा दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे. यावर्षी 7 ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. जर तुम्ही तुमच्या मित्रापासून दूर असाल तर हे मेसेज पाठवून तुम्ही तुमच्या मित्रांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देऊ शकता.

मैत्री करत असाल तर
पाण्या सारखी निर्मळ करा.
दूर वर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल अशी करा.

माझी मैत्री कळायला,
तुला थोडा वेळ लागेल..
पण ती कळल्यावर,
तुला माझं वेड लागेल.

मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं.

बहरू दे आपल मैत्रीच नात
ओथंबलेले मन होऊ दे रित
अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ
घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.

जन्म एका टिंबासारखा असतो
आयुष्य एका ओळीसारखं असतं
प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं
पण मैत्री असते ती
वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो.

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशी ही असली तरी
शेवटी मैत्री गोड असते.

खरच मैत्री असते
पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती
ही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.

काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात.

मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव.

जीवनात दोनच मित्र कमवा…
एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी
युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि
दुसरा ” कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही
तुमच्यासाठी युध्द करेल.

चांगले मित्र,
हात आणि डोळे प्रमाणे असतात
जेह्वा हाताना यातना होतात
तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा
डोळे रडतात तेह्वा हात अश्रू पुसतात.

मैञीला नसतात शब्दांची बंधने,
त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने,
मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात,
पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर
चेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात.

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात.

चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज नसते.
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल.

मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट करा..
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल अशी करा.