दिवाळी हा एक असा सण आहे जो भारतसह जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. दिवाळीचा सण हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळीच्या दिवशी, अयोध्येचा राजा, श्री राम यांनी आपले 14 वर्षांचे वनवास संपवून आपल्या राज्यात परत आले होते आणि म्हणूनच लोकांनी सगळीकडे दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते.
Diwali wishes in Marathi: तर मित्रांनो तुम्हाला दिवाळी का साजरी केली जाते याबद्दल तर समजलेच असेल. आणि या सणाला अजून अनमोल करण्यासाठी आम्ही या लेखामध्ये घेऊन आलो आहोत Diwali message in Marathi. हे सुंदर सुंदर diwali quotes in marathi तुम्हाला दिवाळी सणाचे महत्त्व जाणून घेण्यास मदत करेल व तुमचा संदेश इतरांनाही पोचवण्यात देखील मदत होईल.
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ⚡️⭐️
पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा
एक नवी दिशा नवे स्वप्न,
नवे क्षितीज, सोबत माझ्या
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🪔
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.🪔
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
ली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट!!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
🪔शुभ दीपावली🪔
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला
किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो
ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
दिपावळीच्या शुभेच्छा! सस्नेह नमस्कार,
दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत,
साजरा होत असलेल्या आनंदमयी,
उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त
आपणास व आपल्या परिवारास
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी,
भरभराटीचे, प्रगतीचे,
आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!
सुखं होवोत ओव्हरफ्लो,
मस्ती कधी न होवो स्लो,
धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव,
असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.
हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी,
नाव तुझं जपतो सदैव,
मिळो आम्हा भक्तांना
सुख-संपत्ती अपार,
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या
शुभेच्छा अपरंपार.
धनाची पुजा यशाचा
प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान
मनाचे लक्ष्मीपुजन संबंधाचा
फराळ समृध्दीचा पाडवा
प्रेमाची भाऊबीज अशा या
दिपावलीच्या आपल्या
सहकुटुंब, सहपरिवरास
🪔सोनेरी शुभेच्छा!!!🪔
आनंद घेऊन येतेच ती
नेहमीसारखी आताही आली
तिच्या येण्याने मने आनंदाने
आनंदमय झाली सर्व
मित्र-मैत्रीणीना मनापासून
आनंदाची शुभ दिपावली.
🪔🪔Happy Diwali🪔🪔
अंधार दूर झाला रात्रीसोबत,
नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन,
डोळे उघडा एक मेसेज आला आहे,
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.🪔
प्रत्येक घर उजळू दे,
कधीही न होवो अंधार,
घराघरात साजरा होऊ दे
आनंद, घराघरात होवो दिवाळी,
प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी,
प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी
णि सुगंधित होवो प्रत्येक सकाळ,
सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष विसरून
मनात ठेऊ नये शंका आणि
शुभेच्छांमध्ये असो गोडवा.