दिवाळी म्हणजे आनंद आणि उत्सवाचा सण… चार ते पाच दिवसांचा दिवाळसण गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वच जण जल्लोषात साजरा करतात. दिवाळीच्या सणातील दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी म्हणजेच वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी करतात. म्हणजेच वसूबारसनंतर धनत्रयोदशी येते. हा दिवस देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. धनत्रयोदशीला काही लोक धनतेरस असंही म्हणतात. या दिवशी लोक घरातील धान्य, वर्षभरातील हिशोबाच्या वह्या, दागदागिने यांची मनोभावे पूजा करतात. या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने घरातील लोकांना आरोग्य आणि सुख लाभते अशी प्रथा आहे.
दिवाळीच्या मंगलमय सणाची सुरूवात करणाऱ्या धनत्रयोदशीसाठी प्रियजनांना द्या या धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Dhanteras Wishes In Marathi)
2. आला आला दिवाळीचा सण, घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण, दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी, धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
4.धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
6. धनत्रयोदशीचा हा दिन, धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन, लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी, तुमची मनोकामना पूर्ण होवो सारी… धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
8. धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी, कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी, फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी, मिळून सारे साजरे करू आली रे आली दिवाळी आली….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
10. माता लक्ष्मीची कृपा आपणांवर सदैव राहू दे… यश आणि समृद्धी आपणांस कायम मिळू दे…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा