Ameesha Patel Birthday: पहिलाच चित्रपट ठरला सुपरहिट, तरीही कारकीर्द वाचवू शकली नाही Ameesha Patel; जाणून घ्या तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अमिषा पटेल तिचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. अमिषा चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सतत चर्चेत असते. अमिषा अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी एका रात्रीत उंची गाठली. 9 जून 1976 रोजी गुजराती कुटुंबात जन्मलेल्या अमीषा पटेलने 2000 मध्ये हृतिक रोशनसोबत ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटाच्या यशाने तिला बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्री म्हणून प्रस्थापित केले. अमिषाच्या साधेपणासोबतच तिची संवादफेक करण्याची पद्धतही रसिकांच्या मनात घर करून गेली. अफाट यशानंतर, अमीषाच्या करिअरमध्ये कुठे प्रगती व्हायला हवी होती, तरीही अमीषा स्टारडमपासून दूर राहिली.
अमीषा पटेलचा जन्म 1975 साली एका गुजराती कुटुंबात झाला आणि अमिषा पटेलने टफ्ट्स युनिव्हर्सिटी, यूएसए मधून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. तिने तिच्या विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या पेपरसाठी सुवर्णपदक जिंकले, पण ती मुंबईत परत आली आणि चित्रपटांमध्ये दिसायला लागली.
View this post on Instagram
2000 साली आलेल्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाने केवळ हृतिक रोशन या चित्रपटाचा मुख्य नायक बनला नाही, तर त्या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम करणारी अमिषा पटेलही रातोरात स्टार बनली. त्यानंतर मात्र अमिषा बॉलीवूडमध्ये लोकांच्या अपेक्षेप्रमाणे ती इनिंग खेळू शकली नाही.
2002 मध्ये अमिषा हृतिक रोशनसोबत ‘आप मुझे अच्छे लगने लगे’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर धमाल केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिषा पटेलची दिग्दर्शक विक्रम भट्टसोबतची जवळीक या चित्रपटाच्या सेटवरच सुरू झाली. हळूहळू दोघे खूप जवळ आले आणि जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले.