Sourav Ganguly Birthday: ‘दादाची दादागिरी’, सौरव गांगुलीचा विक्रम जो सचिन-कोहलीही मोडू शकले नाहीत

WhatsApp Group

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा आज वाढदिवस आहे. क्रिकेट जगतात दादा म्हणून प्रसिद्ध असलेला गांगुली 51 वर्षांचा झाला आहे. कोलकात्याच्या या खेळाडूने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत पण हार मानली नाही. त्याने जगाला आपले कौशल्य दाखवले. सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटला एक नवी ओळख निर्माण करून दिली. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे चित्र बदलले.

या डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले. असे काही विक्रम आहेत जे सचिन आणि कोहली देखील मोडू शकले नाहीत. गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग चार वेळा सामनावीराचा किताब पटकावला आहे. त्याचा विक्रम आजही कायम आहे. ते अद्याप कोणत्याही खेळाडूला मोडता आलेले नाही.

सौरव गांगुलीच्या नावावर असे काही विक्रम आहेत ज्यांना अद्याप कोणत्याही भारतीय फलंदाजाने स्पर्श केलेला नाही. एकदिवसीय विश्वचषकात गांगुलीने भारतासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आहे. 1999 च्या विश्वचषकात त्याने श्रीलंकेविरुद्ध 183 धावांची खेळी केली होती. गांगुलीसोबतच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. त्याने 3 शतके झळकावली आहेत. गांगुलीची आयसीसी टूर्नामेंटमधील नॉकआऊट सामन्यांमध्ये सरासरी 85.66 आहे.

गांगुलीने 11 जानेवारी 1992 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामना म्हणून टीम इंडियासाठी पहिला सामना खेळला. या सामन्यात तीन धावा केल्यानंतर गांगुलीला चार वर्षांसाठी संघातून वगळण्यात आले होते. 1996 मध्ये तो एकदिवसीय संघात परतला. यानंतर गांगुलीने मागे वळून पाहिले नाही. गांगुली जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर त्यांची बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. 2019 मध्ये ते बीसीसीआयचे अध्यक्षही झाले. हे पद भूषवणारे ते पहिले क्रिकेटपटू होते. ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांची बीसीसीआय अध्यक्षपदी निवड झाली आणि पुढील तीन वर्षांसाठी ते या पदावर होते.