HBD Riteish Deshmukh: कॅमे-यासमोर आणि कॅमे-याच्या मागचा ‘लय भारी’ अभिनेता रितेश
राजकारणी कुटुंबातून येत अभिनय आणि कॅामेडी टायमिंगने प्रेक्षकांवर आपली भुरळ पाडणारा अभिनेता रितेश देशमुखचा आज ४३ वा वाढदिवस आहे. बॅालिवूडमध्ये अनेक मराठी कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीत वेगळ स्थान निर्माण केलं आहे. सोशल मिडीयावर प्रचंड अॅक्टिव्ह असणारा आणि प्रेक्षकांच भरभरून मनोरंजन करणारा रितेश देशमुख हा मराठमोळा अभिनेता आपली वेगळी इमेज बनविण्यात यशस्वी झालाय. जाणून घेऊयात रितेशबद्दलच्या काही खास गोष्टी..
रितेशनं २००३ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. २००३ मध्ये त्याने ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटातून सिनेकरिअरला सुरुवात केली. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री जिनिलिया डिसूझादेखील होती. त्यानंतर ‘तेरे नाल लव हो गया’ या चित्रपटातही हे जोडपं एकत्र दिसलं होतं. आजवर रितेशने ‘मस्ती’, ‘ग्रँड मस्ती’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘हाउसफुल २’, ‘हाउलफुल्ल 3’, ‘बैंगिस्तान’, ‘क्या सुपर कूल हैं हम’, ‘डबल धमाल’, ‘जाने कहां से आई है’, ‘अलादीन’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘एक विलेन’ आणि ‘मरजावां’ यांसारख्या चित्रपटाचा समावेश आहे. अचूक टायमिंग आणि हटक्या संवाद कौशल्यामुळे ‘मस्ती’ सारख्या कॅामेडी चित्रपटामध्ये प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली तर ‘एक विलेन सारख्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात त्याने साकारलेला खलनायकही एक वेगळीच छाप सोडून गेला.
तुझे मेरी कसम’ या त्याच्या पहिल्याच सिनेमात रितेश देशमुखची ओळख जिनिलिया डिसुझाशी झाली. चित्रपटाच्या शुटींग दरम्यान जेनेलियाला वाटलं होतं की रितेश मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याने त्यात माज असेल असा विचार करून जेनेलियाने त्याला भाव दिला नाही. कालांतराने रितेश हा फार साधा मुलगा असल्याचं जिनिलियाला जाणवलं आणि मग त्यांची मैत्री फुलत गेली. रितेश आणि जिनिलिया यांनी २ फेब्रुवारी २०१२ ला लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. रिआन असं मोठ्या मुलाचं तर धाकट्या मुलाचं नाव राहिल असं आहे. रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर बरेच अॅक्टीव्ह असतात. दोघं एकमेकांसोबतचे अनेक मजेशीर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या व्हिडिओला फॅनची मोठ्या प्रमाणावर पंसती असते.
मुंबईतील रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून रितेश आपलं शिक्षण पूर्ण केलंय. यांनतर रितेशने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं आणि तो मुंबईत परतला. ‘बॉलिवूड जगतातून नावारूपाला आलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्याला आता दिग्दर्शक होण्याचं “वेड लागलं आहे. काही दिवसांपुर्वी रितेशने सोशल मीडियावर चित्रपटाचं पोस्टर शेअर करत चाहत्यांना दिग्दर्शन करत असल्याचं सांगितलं. ‘वेड’ असे या चित्रपटाचे नाव आहे.12 ऑगस्ट 2022 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून रितेश आणि जिनिलिया या क्यूट कपल पाहण्याची संधी प्रेक्षकांना पुन्हा मिळणार आहे.