भारतीय क्रिकेट संघात असे अनेक युवा खेळाडू आलेत ज्यांनी आपल्या कामगिरीने अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. त्यातलाचा एक खेळाडू म्हणजे मयंक अग्रवाल Mayank Agarwal. कर्नाटकचा असलेल्या मयंकने अनेक खडतर आव्हानांना तोंड देत वेळोवेळी आपले कौशल्य दाखवले आहे. त्याच मयंकचा आज वाढदिवस आहे Happy Birthday Mayank Agarwal.
मयंकने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत धावा करून निवडकर्त्यांच्या नजरेत स्थान निर्माण केले होते, अनेक वर्षे खडतर आव्हानांना तोंड दिल्यानंतर मयंकची 2018 साली वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड झाली होती. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची ही सुरुवात होती. त्यानंतर मयंकने आपल्या दमदार खेळीने भारतीय कसोटी संघात एक महत्वाचं स्थान मिळवलं.
यंदाच्या आयपीएलमध्ये मयंक अग्रवाल पंजाब किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. मयंकने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत 19 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 33 डावांमध्ये 43.3 च्या सरासरीने 1429 धावा केल्या आहेत. मयंकचा कसोटीत सर्वाधिक स्कोर हा 243 आहेत. त्याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 2 द्विशतके, 4 शतके आणि 6 अर्धशतके केली आहेत. मयंकने आतापर्यंत 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या खात्यात 86 धावा जमा झाल्या आहेत.