Happy Birthday Ekta Kapoor : लग्न न करताच एका मुलाची आई आहे टेलिव्हिजन क्वीन एकता कपूर

WhatsApp Group

Happy Birthday Ekta Kapoor : बॉलिवूड (Bollywood) आणि टीव्ही (TV) इंडस्ट्रीमध्ये असे मोजकेच नाव आहेत जे पडद्याच्या मागे राहून देखील लोकं त्यांचे मोठे फॅन आहेत. यातलच एक नाव म्हणजे एकता कपूर (Ekta Kapoor). टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन म्हणून ओळखली जाणारी एकता आज म्हणजेच 7 जून 2022 रोजी आपला 47 वा वाढदिवस (Ekta Kapoor Birthday) साजरा करत आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जितेंद्र (Bollywood Actor Jitendra) यांची मुलगी असताना देखील तिला अनेकदा नकारांना सामोरे जावे लागले आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया एकताच्या जीवनाविषयी (Ekta Kapoor Life) काही रंजक गोष्टी..

बॉलिवूड अभिनेते जितेंद्र आणि निर्मात्या शोभा कपूर यांच्या घरात 7 जून 1975 रोजी मुबंईमध्ये तिचा जन्म झाला. एकताचे प्राथमिक शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूल येथे झाले. मिठीबाई महाविद्यालयामधून तिने पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिने वडील जितेंद्र यांच्याकडे मदत मागून टीव्ही मालिका बनवण्यास सुरुवात केली. तेव्हा तिचे वय फक्त 19 वर्षं होते. आपल्या मेहनतीच्या बळावर आज एकता यशस्वी दिग्दर्शक, स्क्रिप्ट रायटर आणि निर्माती आहे.

प्रोफेशनल लाईफमध्ये यशस्वी असलेली एकता खासगी लाईफमध्ये आजही कुमारी आहे. अद्याप तिचे लग्न झालेले नाही. याबाबत बोलताना एकदा एकताने सांगितले की, वडिलांच्या एक अटीमुळे मी लग्न केले नाही. नाही तर एकता वयाच्या 22 व्या वर्षीच लग्न करणार होती. तिने संगितले की, जेव्हा मी 17 वर्षाची होती तेव्हा वडिलांनी म्हटले होते की, पार्टी करण्यापेक्षा लग्न कर किंवा काम कर, ते मला पाकीट मनी शिवाय काही देत नव्हते. त्यामुळे पैसे कमविण्यासाठी मी एका जाहिरात एजन्सीमध्ये कामाला सुरुवात केली.

एकताने एकदा आपल्या लग्नाविषयी बोलताना सांगितले होते की, त्यावेळी अशी परिस्थिती होती की, मला वाटतं होत की, माझे जीवन व्यस्थित आहे. 22 व्या वर्षी लग्न करू जीवनाचा आनंद होऊ, पण, बऱ्याचदा आपण जे विचार करतो ते नशिबाने म्हणा किंवा दुर्भाग्याने होत नाही. त्यानंतर ‘हम पांच’ मालिकेचे पायलट शूटिंग केले आणि झी टीव्हीला विकले. ही मालिका हिट ठरली आणि माझे सर्व मार्ग बदलले. एकता कपूर 2019 साली सरोगसीच्या मदतीने आई बनली आहे. तिने आपल्या मुलाचे नाव वडिलांच्या नावाप्रमाणे रवी कपूर असं ठेवले आहे.